इंधन दरवाढीचा भडका : जाणून घ्या आजचे नवीन दर

0

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेले आहेत. परिणामी कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० वेळा दरवाढ केली आहे. या दरवाढीने पेट्रोल ७.४४ रुपयांनी महागले आहे. तर याच कालावधीत डिझेल ७.५२ रुपयांनी महागले आहे.दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल २६ पैशांनी आणि डिझेल दरात ७ पैशांची वाढ केली. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल १०३.८९ रुपये झाले आणि तर डिझेलसाठी ९५.७९ रुपये भाव आहे.

कंपन्यांनी काल बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर त्याआधी मंगळवारी पेट्रोल २८ पैशानं आणि डिझेल २६ पैशांनी महागले होते. तर सोमवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. रविवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात २९ पैसे वाढ केली होती तर डिझेलमध्ये २८ पैशांची वृद्धी केली होती.

आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.८९ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९७.७६ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.८८ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९७.६३ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५.९९ रुपये झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.