डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शेतकरी विरोधी कायद्याच्या मसुद्याचे दहन

0

जळगाव : केंद्रातील भाजपा सरकारने देशातील शेतकर्‍यांवर लादलेल्या तीन कृषिविषयक काळ्या कायद्याच्या मसुद्याचेडॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजीत कार्यक्रमात दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टिकेची झोड उठविली. दरम्यान कोविड काळात जीवाची पर्वा न करता रूग्णसेवा करणार्‍या कोविड योध्यांचा प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्तेसन्मान करण्यात आला

यांची होती उपस्थिती

प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले बुधवारी जिल्हा दौर्‍यावर होते. या दौर्‍यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांच्या उपस्थितीत शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या प्रतींचे दहन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, किसान सेलचे शाम पांडे, अश्विनी बोरस्ते,माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी आ.रमेशदादा चौधरी, गटनेते प्रभाकर सोनवणे, ज्येष्ठ नेते डी.जी.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी प्रदेश चिटणीस डी.जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, प्रदीप पवार, अशोक खलाणे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, राजू मोरे, गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोदींविरूध्द लढा सुरूच राहील

तीन काळ्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र असून इंग्रजांविरोधात काँग्रेसने जो लढा दिला, तोच संघर्ष इंग्रजांची मानसिकता  असलेल्या मोदी सरकारविरोधात सुरु राहील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंग्रज राजवटीविरोधात देशाने जसा लढा दिला, तसाच लढा आता मोदी सरकारविरोधात द्यायची वेळ आली आहे. पहिल्या व दुसर्‍या लाटेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून जनसेवा केली. तिसरी लाट येऊ घातली असून त्यादृष्टीने सतर्कतेचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यासाठीही कार्यकर्ते सज्ज आहेत. कोविडचा आढावा जिल्हानिहाय घेत असून त्यासंबंधी प्रशासनाला सूचना करीत आहोत, असे सांगताना मोदींनी ठरवले तर कोरोना जाईल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

आमदार नाना पटोले यांच्या हस्ते काळ्या कायद्याच्या मसुद्याचे दहन करतांना केंद्रातील मोदी सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आ. पटोले यांनी ट्रॅक्टर रॅली काढुन शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

उल्हासदादा तुम्ही तर देवदूतच 

कोरोनाचा काळ ओळखुन डॉ. उल्हास पाटील त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील, जावाई डॉ. वैभव पाटील यांनी रूग्णांसाठी ऑक्सीजन प्लांन्ट, यंत्रणा उभी केली. उल्हासदादा तुम्ही तर देवदूतच असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. जे तुम्हाला जमले ते मोदींना जमले नाही. मोदी हे जनतेसाठी यमदूतच ठरल्याची टिकाही आ. प्रणिती शिंदे यांनी केली. आता उलटी गिनती शुरू हो गई असल्याचेही त्या म्हणाल्या.

कोविड योध्यांचा सन्मान

गत वर्षापासून देशभरात कोविडचे संकट पसरले आहे. अशा संकट काळातही जीवाची पर्वा न करता अविरतपणे रूग्णसेवा करणार्या कोविड योध्यांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते कोविड योध्यांना प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार नाना पटोले यांनी कोविड योध्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.