चाळीसगाव महाविद्यालयात मानसशास्त्र विभागात स्ट्रेस मँनेजमेंट टेक्निक्स विषयावर आँनलाइन वेबिनार

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) चाळीसगाव येथील बी.पी आर्टस, एस. एम.ए.सायन्स अँण्ड के.के.सी.काँमर्स महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व आयक्वेसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्ट्रेस मँनेजमेंट टेक्निक्स या विषयावर आँनलाइन कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य मा.डॉ.मिलिंदजी बिल्दीकर,उपप्राचार्य डॉ.पी.एस. बाविस्कर,आयक्वेसी समन्वयक व उपप्राचार्य डॉ.काटे, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा.डॉ. शशिकांत खलाणे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा.एल.व्ही.उपाध्ये आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा.एल.व्ही.उपाध्ये यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश व उपयुक्तता तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.मिलिंदजी बिल्दीकर यांनी आपल्या मनोगतात कामाच्या ठिकाणी ताणतणाव निर्माण करणारे अनेक घटक असतात पण त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले तर ताण कमी होवू शकतात याबद्दल आपले मत मांडले.

या प्रसंगी आयक्वेसी समन्वयक उपप्राचार्य डॉ.काटे यांनी आपल्या मनोगतात ताणतणावामूळे शारिरीक व मानसिक आजार होवू शकतात त्यामूळे कामावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो म्हणून ताणतणावाचे नियोजन करणे गरजेचे आहे याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.शशिकांत खलाणे यांनी संपूर्ण मार्गदर्शनात ताणतणावाबद्दल सविस्तर चर्चा केली.ताणाचे प्रकार,ताणाची कारणे ताणाचे परिणाम व ताणाचे नियोजन करण्यासाठी ज्या उपायोजना आहेत जसे ताण निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने बघावे,कामाच वेळेच योग्य नियोजन करणे, ध्यानधारणा,व्यायाम,सकस आहार तसेच कामाच्या प्रती जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या कामाशी प्रामाणिक असणे किती गरजेचे आहे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सौ.सुनिता जगताप यांनी मानले.यशस्वीतेसाठीप्रा.किशोर पाटील व दिपाली बन्सल यांनी विशेष सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.