आ. महाजनांनी शेतकऱ्यांना भूलथापा देऊ नये :- किशोर पाटील

0

जामनेर(प्रतिनीधी):- आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजनांनी शेतकऱ्यांना भुलथापा देऊन फसवेगिरी करून परवा महाआघाडी सरकार विरोधात केलेले आंदोलन फक्त आणी फक्त नौटंकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगेसने पत्रकार परीषदेत केला.

येथीलपक्षाच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेला विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील,संदीप हिवाळे,प्रभु झाल्टे, विनोद माळी,राहुल पाटील आदी पदाधीकारी उपस्थीत होते.भाजपच्या फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफी दोन वर्षांनंतरही शेतकऱ्यांना मिळाली नव्हती,महावीकास आघाडी सरकारने आठ दिवसांतच कर्जमाफीचा थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवुन दिला. आमदारांनी एकेकाळी कपाशीच्या भावासाठी उपोषण केले होते. मात्र सरकार असतांना त्यांना तो भाव शेतकऱ्यांच्या कपाशीला देता आलेला नाही.आणी आज तेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करतात आणी आंदोलनातही शेतकरी कमी व वाळुचे ठेकेदार,बांधकाम ठेकेदार आदी त्यांचेतर्फे लाभार्थी असलेल्यांचीच संख्या जास्त होती.

आरोग्यसेवेचाही गेल्या पंचवीस वर्षात बोजवारा उडाला, त्याकडे लक्ष देण्यास आमदारांना वेळ नाही.दवाखाना सुरू करण्याचे जाहीर करूनही अद्याप का सुरू झाला नाही,असे अनेक प्रश्न पत्रकार परीषदेत उपस्थीत करून जामनेर येथील मका खरेदी कोणामुळे बंद पडली,गोदामाची साधी व्यवस्था तुम्ही करू शकलेले नाही.

तालुक्यातील च शेंदुर्णी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी गोडाऊन उपलब्ध करून दिल्याने मका खरेदी अजूनही सुरु आहे.जामनेरात मार्केट कमेटी मध्ये व शेतकी संघामध्ये सुद्धा आपलीच सत्ता असूनही गोडाऊन अभावी जामनेर मधील मका खरेदी बंद आहे. आता यापुढे शेतकऱ्यांना वेठीस धरणे खपवुन घेतले जाणार नाही, असा ईशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरीषदेत आमदार महाजनांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.