राज्यातील सलुन व जिम सुरू होणार 28 जूनपासून

0

अमळनेर-: लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या व्यायमशाळा आणि सलून सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे ,येत्या 28 जूनपासून व्यायामशाळा आणि सलून सुरु होईल,अशी माहिती अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत बोलवण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सलूनचा व्यावसाय सुरु करण्याबाबत चर्चा झाली.यानंतर कोरोनाची विभागवार परिस्थिती लक्षात घेऊन सलून व्यावसाय सुरु करण्यात येणार आहे. तसेच
याबाबत सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी
केली जातील,असेही आ पाटील यांनी सांगितले.सलूनमध्ये फक्तं केस कापण्याची परवानगी असेल. दाढी
करण्याची परवानगी सध्या नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणारे दोघांनाही मास्क बंधनकारक असेल,
अशी माहिती आ पाटील
यांनी दिली.दरम्यान यासंदर्भात राज्यातील नाभिक संघटनेकडून मागणी होत असताना आंदोलनाचीही भूमिका त्यांनी घेतली होती,अमळनेर येथील सलुन व्यावसायिकांच्या संघटनेने आ अनिल पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्याने त्यांनी काल सकाळी मुंबई येथे गेल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा व्यवसाय सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती,अखेर संपुर्ण राज्यातून होत असलेली मागणी लक्षात घेता मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्याची माहिती आ पाटील यांनी देत या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.तसेच टॅक्सी व प्रवासी वाहतुकीच्या खाजगी वाहनांना प्रवासी क्षमता वाढविण्याचीही परवानगी मिळावी अशी मागणी देखील आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.