आरोग्यसेविकांच्या मेहनतीनेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास यश- आ. मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव येथे आरोग्यसेविका यांच्या सन्मानार्थ ‘भाऊबीज’ सोहळ्याचे आयोजन

 

चाळीसगाव :– (प्रतिनिधी – )आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आमदार झालो, माझा छोटा परिवार आता तालुकाभर  मोठा झाला. आमदारकीच्या पहिल्याच वर्षी कोरोना संकट आले. सर्वजण भीतीत असताना, घरात असताना तुम्ही मात्र जीवाची पर्वा न करता फिरत होतात. सुरुवातीला तर बाहेर गावाहून येणाऱ्याजवळ कुणी थांबत नव्हते पण तुम्ही दररोज न चुकता जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतात. कधीही न विसरता येण्यासारखे एक पुण्याचे काम तुम्ही केले. यावेळी मी व माझा भाजपा पक्ष पदाधिकारी देखील जनतेसाठी फिल्डवर अन्नसेवा, औषध फवारणी करत होतो. भाजपातर्फे चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटुंबांपर्यंत आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपात आशा सेविका व अंगणवाडी ताई यांनी मोलाची मदत केली. अतिशय अल्प मानधनावर या आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस काम करतात. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची किंमत करता येणार नाही. आज जे कोरोनावर आपण नियंत्रण मिळविले त्यात सर्वात जास्त योगदान आरोग्यसेविकांचे आहे. असे प्रतिपादन आ. मंगेश चव्हाण यांनी आज येथे केले .

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाऊंडेशन मार्फत कोरोना काळात जीवाची पर्वा न करता घरोघरी सर्वेक्षण व आरोग्यसेवा देणाऱ्या विविध शासकीय यंत्रणेत अतिशय अल्प मानधन तत्वावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका यांच्या सन्मानार्थ ‘भाऊबीज’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस आदी १३०० आरोग्यसेविका यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे स्नेहवस्त्र म्हणून साडी, मिठाई व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर योगाचार्य चंद्रात्रे बाबा, महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ताई ठाकरे, नगरसेविका झेलाताई पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, जेष्ठ नेते प्रेमचंद भाऊ खिवसरा, उध्दवराव महाजन, नगरसेवक राजेंद्र आण्णा चौधरी, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेविका विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, माजी पं.स. सभापती दिनेश बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर  पाटील,  जि.पं.सदस्य भाऊसाहेब  जाधव, माजी  मार्केट कमिटी सभापती सरदारशेठ राजपूत, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात, सोमसिंग  राजपूत,   फकीरा मिर्झा, बापू अहिरे, पत्रकार एम. बी. पाटील, अंगणवाडी संघटनेचे रामकृष्ण पाटील,   चिराग शेख, चंदू भाऊ तायडे, आबा पाटील वाघडू, डॉ. देवराम लांडे, प्रशांत मिटकरी, माजी पं.स. जगन महाजन, सरचिटणीस धनंजय मांडोळे, अंगणवाडी व आशा सेविकांचे-संघटनेचे पदाधिकारी, वाय आर सोनवणे सर, जगदीश सूर्यवंशी,  सुनिल पवार, भावेश कोठावदे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, चेतन देशमुख, विजय पाटील, अमोल चव्हाण, डॉ.रवींद्र मराठे, निळकंठ मगर या नियोजनात मदत करणारे- अंगणवाडी मुख्य सेविका, आशा सेविका – गटप्रवर्तक व आरोग्य सेविका उपस्थित होते.

गरीब श्रीमंतीच्या वादातून भाऊ बहिणींच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, अनेक बहिणी यांना भाऊ असून देखील ते भाऊबीज साजरी करत नाहीत. गेल्या ८ महिन्यांपासून आम्ही कोरोना सारख्या आजाराशी लढत आहोत, मात्र या काळात आमची कुणालाही आठवण आली नाही. मात्र मंगेश चव्हाण  हे पहिले आमदार असतील ज्यांनी आम्हाला बहिण मानत भाऊबीज सोहळा घेतला. ज्यांना भावाची उणीव भासत असेल ती मंगेशदादांनी पूर्ण केली आहे. दादा, भाऊबीजेला साडी आणि भेट दिली नाही तरी चालेल, फक्त या बहिणींची सुखदुखात आठवण ठेवा, तुमच्या मदतीचा हात आमच्या पाठीशी ठेवा’ असे भावनिक उद्गार अंगणवाडी सेविका मीनाताई चौधरी यांनी काढले.

 

 

शासनाकडे त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या भाऊबीज कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना आश्वस्त करतो की, त्यांचा भाऊ म्हणून शासनाकडे पाठपुरावा करेल वेळ पडली तर मंत्रालयासमोर ठिय्या मांडून सरकारशी भांडेल असा इशारा देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.

 

वसंतराव चंदात्रेबाबा, देवयानीताई ठाकरे, सौ. विजयाताई पवार, दिनेशभाऊ बोरसे, घृष्णेश्वर पाटील, रामकृष्ण पाटील,  आबा पाटील, सौ.सुनंदाताई नेरकर यांनी मनोगतातून उपस्थितांशी संवाद साधला. प्रास्ताविक भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता मिलिंद देव यांनी केले. आभार प्रदर्शन योजनाताई पाटील यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.