जिल्ह्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद, तर एका रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 57 नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीनंतर अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढत असून नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांसोबतच गंभीर रुग्णसंख्याही वाढत चालली आहे.  तीन-चार दिवसांपासून बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त अशी स्थिती आजही कायम होती.

आज दिवसभरात ५७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण आकडा ५४ हजार २३४ झाला आहे. तर ३७ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ५२ हजार ४८४ वर पोचली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.७७ टक्क्यांच्या टप्प्यात आहे.

असे आढळले रुग्ण 

जळगाव शडर १३, जळगाव ग्रामीण ०६, भुसावळ ५, अमळनेर १, चोपडा ३, पाचोरा १, भडगाव ००, धरणगाव ०२,  यावल ००, एरंडोल १, जामनेर १, रावेर ३, पारोळा २, चाळीसगाव ००, मुक्ताईनगर १५, बोदवड ००, अन्य जिल्ह्यातील२.

Leave A Reply

Your email address will not be published.