भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक, ‘या’ ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी

0

नवी दिल्लीः भारत सरकारने आज पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने देशाची सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या अशा ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र सरकारनं ४३ अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं या अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे.

बंदी घातलेली सर्व अ‍ॅप्स भारताचं सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. गृह मंत्रालय आणि सायबर कॉर्डिनेशन सेंटरद्वारे मिळालेल्या अहवालानंतर सरकरानं ही कारवाई केली.

आधी केंद्र सरकारने दोनशेहून अधिक चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. यात टिकटॉक सारख्या प्रसिद्ध अॅपचा समावेश होता.

आज बंदी घातलेली संपूर्ण यादी पाहा.

१) AliSuppliers Mobile App

२) Alibaba Workbench

३) AliExpress – Smarter Shopping, Better Living

४) Alipay Cashier

५) Lalamove India – ७) Delivery App

६) Drive with Lalamove India

७) Snack Video

८) CamCard – Business Card Reader

९) CamCard – BCR (Western)

१०) Soul- Follow the soul to find you

११) Chinese Social – Free Online Dating Video App & Chat

१२) Date in Asia – Dating & Chat For Asian Singles

१३) WeDate-Dating App

१४) Free dating app-Singol, start your date!

१५) Adore App

१६) TrulyChinese – Chinese Dating App

१७) TrulyAsian – Asian Dating App

१८) ChinaLove: dating app for Chinese singles

१९) DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online

२०) AsianDate: find Asian singles

२१) FlirtWish: chat with singles

२२) Guys Only Dating: Gay Chat

२३) Tubit: Live Streams

२४) WeWorkChina

२५) First Love Live- super hot live beauties live online

२६) Rela – Lesbian Social Network

२७) Cashier Wallet

२८) MangoTV

२९) MGTV-HunanTV official TV APP

३०) WeTV – TV version

३१) WeTV – Cdrama, Kdrama&More

३२) WeTV Lite

३३) Lucky Live-Live Video Streaming App

३४) Taobao Live

३५) DingTalk

३६) Identity V

३७) Isoland 2: Ashes of Time

३८) BoxStar (Early Access)

३९) Heroes Evolved

४०) Happy Fish

४१) Jellipop Match-Decorate your dream island!

४२) Munchkin Match: magic home building

४३) Conquista Online II

Leave A Reply

Your email address will not be published.