आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता!

0

आयुक्तांच्या बदलीनंतरही उपायुक्त त्याच पदावर कार्यरत

जळगाव दि. 22-
महापालिकेत आयुक्तांचे आदेश डावलून आपल्याआपल्या पदावर कामकाज कायम ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांचेकडे सामान्य प्रशासनाच्या कामाचा पदभार सोपविण्यात आला होता. तर उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्याकडे सुरुवातीपासून महसुलचा पदभार सोपविण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी प्रशासकीय कारणास्तव व शासकीय कामकाजाकरिता लक्ष्मीकांत कहार यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाचा पदभार काढून चंद्रकांत खोसे यांच्याकडे व चंद्रकांत खोसे यांच्याकडील महसूल विभागाचा कारभार लक्ष्मीकांत कहार यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दि. 23 ऑक्टोबर 2018 रोजीच पारीत केला आहे. मात्र दोन्हीही उपायुक्त आपआपल्या पदावरच कार्यरत होते. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी परत दि. 15 मार्च रोजी परस्पर कारभार बदलण्याचे आदेश पुन्हा पारीत केले. मात्र आयुक्तांची बदली होवून नवीन आयुक्त डॉ. उदय टेकाळे रूजूही झाले आहेत. मात्र दोन्ही उपायुक्त आपापल्या पदावर कार्यरत असल्याचे चित्र महानगरपालिकेत दिसून येत आहे.
सदर पदाचा कार्यभार बदलाचा आदेश तात्काळ अंमलात आणावा, असे आयुक्त चंद्रकांत डांगे यांचे निर्देश असताना आयुक्तांच्या बदलीनंतरही आदेशाची अंमलबजावणी दोन्ही उपायुक्तांकडून करण्यात आलेली नाही. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार हे नवीन असून शासकीय कामाचा त्यांना तितका अनुभव नसल्यानेच त्यांची बदली केली असल्याचे सुत्रांकडून समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.