जेवणाचे बिल मागितल्यावरून हॉटेल मालकास जीवे मारण्याची धमकी

0

तिघांना अटक; हॉटेल न्यू पंजाब खालसा येथील घटना

भुसावळ 22 –
जेवनाचे बिल मागितल्याचा राग आल्याने तिघानी हॉटेल मालकाजवलील 2700 रुपये जबरदस्तीने हिसकावून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल न्यू पंजाब खालसा येथे गुरुवार 21 रोजी रात्री 9.45 वाजेचे दरम्यान घडली .
याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघाना पोलिसांनी त्वरित अटक केली .
दरम्यान शुक्रवार 22 रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघाना तीन दिवस पोलिस कोठडीचे आदेश दिले आहे .
याबाबत अधिक असे की हॉटेल पंजाब खालसाचे मालक सारंगधर पाटिल उर्फ छोटु यांनी फिर्याद दिली की , गुरुवार रोजी रात्री 9 ते 9.45 वाजेचे दरम्यान माझ्या ढाब्यावर हिशोब घेण्यासाठी गेलो होतो . यावेळी 5 ते 6 टेबलांवर काही लोक जेवन करीत होते . तेव्हा सुनील पंचमसिंग राजपूत यांचेकडून हिशोब घेत असतांना एका टेबलवर आशिक उर्फ बाबा काल्या, असलम बेग ,रा. नवीन इदगाह भुसावळ, सलीम पूर्ण नाव माहित नाही रा खडका रोड, भुसावळ, वसीम पटेल रा पटेल कॉलनी, भुसावळ हे तिघे आप आपसत जोर जोरात बोलत होते. त्यांचे जेवन झाल्यावर सुनील राजपूत याने जेवनाचे बिल टेबल वर दिले. त्यावेळी सुनील राजपुतशी हुज्जत घालून हम तेरे मालक से बात करेंगे असे म्हणत आशिक उर्फ बाबा काल्या आणि सलीम हे दोघे कॉउंटेरवर गेले. त्यानंतर सारंग पाटिल यांना म्हणाले की , हमको पहचानता नहीं क्या, काहेका बिल, तुझे जिंदा नही छोड़ेंगे, तुझे जिंदा मार डालेंगे, असे म्हणत खिशांतुन दौन हजार सातशे रुपये कडून घेतले. त्यावेळी सलीम आणि वसीम पटेल हे दोघे यामाह मोटरसायकल (एम एच 19, 5860) यावरुन निघुन गेले. अशी फिर्याद सारंग पाटील यांनी बाज़ार पेठ पोलिस स्टेशनला दिल्यावरुन 392, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्री घटना घडल्यानंतर लागलीच तिघा आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्पोनि जयंद्र शिंदे तपास करीत आहे .
दरम्यान या तिघाना आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता दिनांक 24 पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दीले आहे .
भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग 5 गुरंन-185/2019 भा द वि कलम-392,504,506,34 प्रमाणे दिनांक 22.03.2019 रोजी 01.25 वाजता दाखल आहे यातील आरोपी 1)वसीम पटेल 2)बाबा काल्या 3)सलीम शेख याना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाही पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड ,पो नि श देविदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो स्टे चे स पो नि जयेंद्रें शिंदे, पो उप निरी मनोज ठाकरे,स फो तस्लिम पठाण,पो का संदीप राजपूत, प्रशांत चव्हाण,विकास सातदिवे, अशींनी बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.