डोंगरदे आदिवासी गावात अज्ञात आजाराने 2 बालकांचा मृत्यू

0

यावल दि, 22-
आदिवासी वस्ती असलेल्या तालुक्यातील डोंगरदे येथे अज्ञात आजाराने थैमान घातल्याने गेल्या आठ दिवसात दोन आदिवासी बालकांचा मृत्यु झाला आहे.तर गुरूवारी सकाळी सात आजारी बालंकानां येथील ग्रामीण रुग्नालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल.या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे.गेल्या चार दिवसापुर्वी आरोग्य विभागाकडून आयोजीत लसीकरण सत्रात बालकांना लसीकरण केल्यानेचही घटना घडली असल्याचा आरोप आदिवासी करीत आहेत. आरोग्य विभागाकडून मात्र हा आरोप फेटाळला असून व्हायरल फल्यु कारण असल्याचे सांगीतले आहे.
तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या आदिवासी डोंगरदे वस्तीवरील साडेतीन महीन्याच्या बालकाचा आठ दिवसाआधि मृत्यु झाला. तर बुधवारी होळीच्या रात्री पिंकी हेमराज पावरा वय साडेतीन वर्षे या बालीकेचा मृत्यु झाला आहे. गुरूवारी सकाळी बालीकेच्या मृत्युचे वृत्त कळताच येथील आरोग्य विभाग खळबळून जागा होत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांनी पथकासंह सकाळीच आदिवासी वस्ती गाठली. तेथे गेल्यांनतर तेथील आनंद रीजला पावरा वय 3 वर्षे, भरत सुनिल पावरा वय 3 वर्षे, शरद सुनिल पावरा वय 3 महीने, दिक्षा नितीन पावरा वय दिड वर्षे, पवन विनोद पावरा वय 3 महीने रोशनी बिलालसींग चव्हान वय 8 महीने कृष्णा गुमान पावरा वय अडीच वर्षे या सात आजारी बालकांना येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले असून डॉ. शुभम जगताप त्यांचेवर उपचार केले असून दुपारी त्-यांना सोडण्यात आले आहे. सर्दि, बारीक ताप, संडाशी तर काहीना उलटीचा त्रास असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगून व्हायरल संसर्ग असल्याचे सांगीतले.
शुक्रवार पासून बालकांचा सर्व्हे
शुक्रवारी सकाळपासून वस्तीवर आजारी बालकांची तपासणी तपासणी करण्यात येईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांन सांगीतले.

16 मार्च रोजी आरोग्य विभागाने डोंगरदे वस्तीवर बीसीजी, पोलीयो, पेंन्टा व्हॅलन्ट, आणि आय. पी. व्ही या आजारावरील लसीकरण सत्र आयोजीत केले होते. तेथे बालकांना लसीकरण केल्यानेच ही घटना घडली असल्याची आदिवासींच्या मनात भिती आहे.

व्हायरल फल्यु-
मयत बालकाचे कुटुंब  उसतोड करणारे असून ते नुकतेच वस्तीवर परतले लसीकरणाचे काही दिवस आधि एका सहा महीन्याच्या बालकाचा मृत्यु झाला तर लसी्ररणानंतर चार दिवसांने पिंकी पावरा या साडेतीन वर्षीय बालीकेचा मृत्यु झाला आहे. लसीकरणाने झाले असते तर ते तात्काळ अथवा एक दोन दिवसातील घटना असती आणि सहा महीन्याच्या बालकाचा मृत्यु हा लसीकरणाचे अगोदचा आहे. सात आजारी बालकामघे केवळ एका बालकास लसीकरण केल्ले आहे तर अन्य बालकांना लसीकरण केलेल नव्हते.त्यामुळे आदिवासींची शंका बरोेंबर नाही तर त्याचे कारण व्हायरल फल्यु असल्याचे सांगीतले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे

Leave A Reply

Your email address will not be published.