आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्टची सर्वाधिक पगाराची ऑफर

0

मुंबई – कॅम्पस मुलाखतीपूर्वीच कंपन्यांनी आयआयटी मुंबईच्या दीडशे विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली असून सर्वाधिक म्हणजे वार्षिक दीड कोटी रुपये पगार मायक्रोसॉफ्टने देऊ केला आहे, तर वर्षांला २५ लाख रुपयांपेक्षा अधिक पगार देणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढली आहे.

मुलाखतींचे सत्र आयआयटीमध्ये ‘प्लेसमेंट’ सुरू झाले असून दीड कोटी वार्षिक पगाराचा प्रस्ताव मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांसाठी ठेवला आहे. कंपनीने अमेरिकेतील शाखेसाठी उमेदवारांची निवड केली आहे. १५६ विद्यार्थ्यांना यंदा मुलाखती देण्यापूर्वीच नोकरीचे प्रस्ताव आले होते.

अनेक मुलाखती विद्यार्थ्यांना द्याव्या लागू नयेत आणि कंपन्यांनाही निवड करणे सोपे जावे म्हणून आयआयटीने यंदा मुलाखतींचे सत्र सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. इच्छुक कंपन्यांना या परीक्षेच्या गुणांची यादी देण्यात आली. विविध कंपन्यांनी त्याआधारे विद्यार्थ्यांपुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील १२६ विद्यार्थ्यांनी नोकरी स्वीकारली आहे. यंदा पहिल्या तीन दिवसांमध्ये २७५ कंपन्यांचे नोकरीचे ८०० प्रस्ताव आयआयटी मुंबईकडे आले आहेत. त्यासाठी संस्थेतील १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.