दंगलींबाबतची माहिती पोलिसांना सांगा: शिवसेना

0

मुंबई:  पुढील काही दिवसांत राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगली घडवण्याचा कट असल्याची बातमी मिळाल्याचा दावा करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेनं टोला लगावला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात कुठेही दंगली होणार नाहीत. जर याबाबत कुणाकडे माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे, असं शिवसेना खासदार संजय राऊतम्हणाले. राम मंदिराच्या मुद्दयावरून दंगली घडविण्यासाठी ओवेसीसारख्या लोकांबरोबर बोलणी सुरू असल्याची गंभीर बातमी मला दिल्लीवरून समजल्याचा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी मुंबईतील विक्रोळी महोत्सवात केला होता. सध्याच्या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंगलींवर निवडणूक लढवायची आहे, असं ते म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी राज यांना टोला लगावलाय. राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात काही दंगली होणार नाहीत. पण दंगली घडवण्याचा कट असल्याची माहिती कुणाकडे असेल तर त्यांनी याबाबत पोलिसांना सांगावे, असं राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.