आनंदाची बातमी ! ससून रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी यशस्वी ; करोनाबाधित झाला बरा

0

पुणे : ससून रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी अखेर एका करोनाग्रस्तावर यशस्वी झाली. ही राज्यातील  ठरल्याने करोनाचा संसर्ग बरा करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पुणे शहरात करोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे, अशा परिस्थितीत ससून रुग्णालयाने “प्लाझ्मा थेरपी’तून रुग्णांना आशेचा किरण दाखविला आहे. यासाठीच्या आवश्‍यक सर्व परवानग्यानंतर दात्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे. प्लाझ्मा थेरपी झाल्यानंतर 15 दिवसांनी संबंधित व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अतिदक्षता विभागातून त्यांना इतर वॉर्डमध्ये हलविण्यात आले असून लवकरच त्यांनी घरी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ससूनच्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.