कपाशी लागवडीसाठी अंजनी धरणातील पाणी उपलब्ध होणार

0

एरंडोल (प्रतिनिधी) : चालू वर्षांमध्ये अंजनी धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला होता सध्या धरणात 37 टक्के साठा आहे त्यामुळे या महिन्यात कपाशी व इतर पिकांच्या लागवडीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती एरंडोल गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी दिली आहे.

अंजनी धरणावरील डावा व उजवा कालवा काळा बंधारा यावरील सुमारे 800 हेक्टर जमिनीला रब्बी हंगामात व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाण्याचा लाभ झाला आहे. याशिवाय एरंडोल करांना चालू वर्षात पिण्याच्या पाण्याची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.