कजगाव येथे गढरी परिवारात घरात पार पडला आदर्श विवाह

0

कजगाव(प्रतिनिधी) :-कोरोना या विषाणुच्या महामारीने देशासह राज्यात सर्वत्र संचारबंदी असल्याने सार्वजनिक व मंगल समारंभास बंदी असल्याने या वर गढरी परिवाराने मात करत घरच्या मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने घरात सुरक्षीत अंतर ठेवत एक आदर्श विवाह पार पाडला.

कजगाव ता.भडगाव येथील सुरेश महादू गढरी यांचा मुलगा सुयोग व पारोळा येथील विठ्ठल भिकन सावंत यांची कन्या मनिषा यांचा विवाह तीन ते चार महिण्या पुर्वी ठरलेला होता मात्र कोरोना या आजाराने देशासह राज्यात थैमान घातल्याने शासनाने सर्वत्र संचारबंदी , व सुरक्षीत अतंर ठेवण्याच्या अटी घालून दिल्याने सार्वजनिक कार्यक्रम समारंभ घेण्यास बंदी असल्यामुळे वर – वधु पक्षाच्या घरातील जेष्ठ मंडळी यांच्याशी सल्ला मसलत करीत लग्न समारंभातील होणारा वारेमाप खर्च टाळून कोणताच वाजागाजा न करता राम वाडी राजकुवर मंगल कार्यालय जवळ कजगाव येथील राहत्या घरी दि १९ रोजी दोन्ही परिवारातील मोजके नातेवाईकांच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत तोंडाला मास्क लावुन शासनाने लावलेल्या नियमाचे पालन करुण चि. सुयोग व चि.सौ.का मनिषा यांचा आठ ते नऊ जणांची उपस्थितीत विवाह पार पाडला.
या प्रसंगी मुला मुलीचे आई-वडील, मामा-मामी,सुनिल गढरी, आशा गढरी, लक्ष्मण खैरनार, योगेश हरणे, ब्राम्हण देवा या सर्वांच्या साक्षीने विवाह सोहळा संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.