आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची 17 प्रकरणे मंजुर

0

जळगांव. दि.12-
जिल्हयाभरात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुबांना शासकिय मदत देण्यात यावी या प्रस्तांवासंदर्भात शेतकरी आत्महत्या समितीची आज मंगळवार 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषि अधिक्षक, पोलिस अधिक्षक आदि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी आत्महत्या समिती सदस्यांच्या बैठकीत जिल्हयातील आत्महत्या झालेल्या शेतकर्‍यांची 21 प्रकरणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील 3 प्रकरणे अपात्र 1 प्रकरण फेरचौकशीसाठी पाठवण्यात आले असून धरणगांव तालुक्यातील अनिल गोपीचंद कोळी. चांदसर, सुजित मोरेश्वर ढाके साळवा, चंद्र्रकांत संजय पाटील निंभोरा, शिवाजी जगन्नाथ पाटील धार, जामनेर तालुक्यातील सुरेश सुभाष ग्यान रा चिंचखेडा तवा, रघुनाथ किसन साबळे तोंडापुर, पाचोरा तालुक्यातील गोविंदा अशोक चौधरी-तेली कळमसरा, अनिल उर्फ चांगदेव ओंकार पाटील-हिरे. जामने ,अमळनेर तालुक्यातील रामचंद्र हिलाल पाटील. वासरे, सुदाम भिकन पाटील देवगांव-देवळी,पारोळा तालुक्यातील नामदेव रामदास पाटील भोकरबारी, एकनाथ पांडूरंग मकासरे. सार्वे, दिलीप गोटन पाटील. चोरवड, जळगांव तालुक्यातील समाधान भागवत पाटील. भादली खु, भडगांव तालुक्यातील गोकुळ खुशाल माळी खेडगांव खु., एरंडोल तालुक्यातील छगन तोताराम महाजन. आडगांव., चेतनसिंग उमेदसिंग पाटील, पिंपळकोठा बु., असे एकुण 17 प्रकरणांच्या प्रस्तावांना शेतकरी आत्महत्या समितीच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.