पाचोर्‍यात पंन्नास हजाराचा घुटका पकडला

0

पाचोरा दि.12 –
धुळ्याहून पाचोरा येथे घुटक्याची गाडी येत असल्याची निनावी भ्रमणध्वनी व्दारे पोलीसांना माहिती मिळाल्याने पोलिस उपाधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे, दत्तात्रय नलावडे, हवालदार प्रकाश पाटील, राहुल सोनवणे, राहुल बेहरे, अमृत पाटील, प्रशांत चौधरी,किशोर पाटील यांनी साफळा रचून पहाटेच्या 9 वाजेच्या दरम्यान पाचोरा ते गिरड दरम्यान पॅजो रिक्शा क्रमांक एम. एच. 03 ए. एच. 8474 ह्या वाहनातून सुमारे पन्नास हजाराचा घुटका जप्त करुन संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. पाचोरा शहरातील शिंधी कॉलनितील रहिवासी शंकर पंजुमल पंजवानी वय 25 हा दिनांक 12 रोजी सकाळी नऊ वाजता पॅजो रिक्शात विमलच्या सात पिसव्यात सुमारे 50 हजाराचा घुटका धुळे येथून पारोळा,अंजनविहिरे गिरड मार्गे पाचोरा येथे येत होता.पाचोरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी गाळण येथून गावठी दारुची भट्टी उध्वस्त करून परत येत असतांना पाचोर्‍यात घुटका येत असल्याची माहिती मिळाली होती.पोलिसांनी सापळा रचून शंकर पंचवानी यास वाहानासह ताब्यात घेतले. या घटनेमुळे तालुका भरातील घुपका विक्रेत्यांचे घाबे दणानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.