जिल्हाधिकार्‍यांकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीची आढावा बैठक

0

पाचोरा -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील पाचोरा व भडगाव तालुक्यातील जळगांव लोकसभा निवडणूकीची पूर्व तयारीची आढावा बैठक आयोजित करून मतदान केंद्र, दिव्यांगत मतदार केंद्र, संवेदनशील मतदान केंद्रांची पहातणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहशिलदार कैलास चावडे, गणेश मर्कड (भडगाव) पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पालीकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पाचोरा येथे भेट दिल्याने त्यांचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी स्वागत केले व डॉ. ढाकणे यांनी प्रांताधिकारी कार्यालयात पाचोरा भडगाव तालुक्यातील 307 मतदान केंद्राचा आढावा झोनल अधिकार्‍यांकडून जाणून घेतला. यानंतर गो से हायस्कूल येथील मतदार केंद्र व स्ट्रांग रुमची पहाणी केली. लोकसभा निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी पोलिस उपाधीक्षक ईश्वर कातकडे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सतर्कता पाळण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.