आता मानसिक आजाराला सुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण

0

नवी दिल्ली 

विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी’ (IRDA) ने मानसिक रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. शारीरिक आजारासोबतच आता मानसिक आजाराला सुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण कवच देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारांना सुद्धा विम्याचं संरक्षण कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘इरडा’ने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. विमा कंपन्यांनी मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर विमा संरक्षण कवच मिळण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावेत, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जागतिक स्तरांवरील काही कंपन्या मानसिक आजारग्रस्तांना २-३ वर्षांनंतर विमा संरक्षण कवच देण्याचं काम करतात. इरडा मेंटल हेल्थकेअर अॅक्ट २०१७ नुसार विमा संरक्षण कवच देण्याचा नियम आहे. या अॅक्टच्या कलम २१ (४) नुसार विमा कंपन्या शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारालाही विमा संरक्षण देण्याची तरतूद आहे.

मेंटल हेल्थकेअर अॅक्ट २९ मे २०१७-१८ पासून परिणामकारक झाला होता. या कायद्यानुसार मेंटल हेल्थकेअरमधील एका व्यक्तीच्या मानसिक स्थितीतील अनैलेसिस आणि डायग्नोसिसचा समावेश आहे. तसेच यात त्या व्यक्तीचा उपचार आणि त्याचे पुनर्वसन जोडलेले आहे. यामुळे मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना सन्मानपुर्वक जीवन जगण्याची संधी मिळेल तसेच मानसिक आजारग्रस्तांना लोक स्वीकारतील, असे सिग्ना टीटीके हेल्थ विमा कंपनीच्या मुख्य ऑपरेटिंग अधिकारी ज्योती पुनिया म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.