भारतीय संविधान च्या प्रति जाळल्याच्या निषेधार्थ भडगाव शहर बंद

0

भडगाव- सागर महाजन

दिल्ली जंतर मंतर येथे भारतीय संविधानाच्या प्रती झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ भडगाव बंद आंदोलन पुकारण्यात आलेल्या सर्व संघटनांच्या माध्यमातून आज भडगाव शहर 100% बंद करण्यात आले होते।
सकाळी यशवंत नगर येथे एकत्रितपणे जमून संविधान संघर्ष समितीने मोठा मोर्चा काढला, यशवंत नगर पाचोरा रोड मार्गे हा मोर्चा पाचोरा चौफुली येथे येऊन या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. शेवटी भारतीय संविधानचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संविधान संघर्ष समितीचे आयोजक एस. डी.खेडकर, रमेश कांबळे, अण्णा मोरे,सुरेंद्र मोरे,अनिल वाघ, रवी अहिरे,विनोद मोरे, सुधाकर वाघ,सिध्दार्थ सोनावणे, मनोज सोनावणे, विनोद अडकमोल, पितांबर खैरनार, रामा पवार, विशाल सोनावणे,अजय सोनावणे, गौतम बागुल,अशपक पटवे,प्रितम सोनावणे, यांच्या सह भडगाव तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठया प्रमाणात हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.