आता जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ

0

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय रायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.

काय आहे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस?

“3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.

सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.