आता अर्ध्या तासात होणार कोरोनाची रॅपिड चाचणी; ICMR ची मंजुरी

0

नवी दिल्ली:  इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोविड-१९ च्या चाचणीसाठी आरटी-पीसीआरच्या मदतीने अँटीजन डिटेक्शन टेस्ट वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात काही सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. या चाचणीमुळे आता अर्ध्या तासात कोरोना रुग्णाचे निदान होऊ शकणार आहे. त्यामुळे अहवालासाठी २४ तास वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही. या रॅपिड टेस्टींग किटद्वारे नाकातून नमुने घेतले जाणार आहेत. त्यामुळे आता कमी वेळात रुग्णांची ओळख होणार आहे.

जे अँटीजेन डिटेक्शन टेस्टमधून पॉझिटिव्ह रिपोर्ट करतात त्यांना पॉझिटिव्ह मानले जाईल, त्यांना आरटीपीसीआर चाचणीची गरज भासणार नाही असे आयसीएमआर ने म्हंटले आहे.  अवघ्या अर्ध्या तासात हे अहवाल येणार आहेत. यात अहवाल सकारात्मक आल्यास अशा रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे मानले जाईल. नकारात्मक अहवाल आल्यास अशा रुग्णाची आरटी-पीसीआर घेण्याची आवश्यकताच उरणार नाही. कमी वेळात तपासणी करता आल्याने रुग्णालयातील गैरसोय देखील टाळता येणार आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात चाचण्या तर होतीलच पण रुग्णांचे निदानही लवकर होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.