निपाणे परीसरात ‌पेरणीवर पाऊस नाही ; शेतकरी चिंतेत

0

निपाणे,ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे सह परीसरात रोहिणी नक्षत्राच्या शेवटी दोन पाऊस झालेत व मृगात दि, १४ जूनच्या रात्री पुन्हा पाऊस झाल्याने‌ परीसरातील शेतकऱ्यांनी१५ जून पासून पेरणीला सुरुवात केली होती. मात्र त्यावर २ ते ३ दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत या दोन दिवसांत पाऊस पडला नाही तर उगवणीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेतकरी वर्ग पावसाची प्रतीक्षा करु लागले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी धुळ पेरणी केली त्यांची उगवत चांगली झाली असल्याचे दिसते हवामान खात्याने दोन तिन दिवसांत जोरदार पाऊस येईल असे संकेत दिले होते. परंतु पाऊस मात्र हुलकावणी देत निघून जात असून दररोज ढग दाटून येतात ‌मेघ गर्जनाही होते परंतु पाऊस काही पडत नाही. पेरणी वर पाऊस पडला नाही तर कोवळ्या कोंबांना किडे वान्या चिमणी पाखरे खावून नुकसान करतील तेव्हा पिकांची सांधा सांध शेतकऱ्याला करावी लागणार यात शंका नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चातका प्रमाणे पावसाची वाट पहात परमेश्र्वराची आराधना करु लागले आहेत मृग नक्षत्रात वाहन म्हैस होते. म्हशीला खुप पाणी लागते म्हणून पाऊस चांगला पडेल असे वाटत होते. आता मृग अर्ध्यावर निघून गेले आहे.

दि , २१ जून रोजी हे नक्षत्र संपत असून आद्रा नक्षत्राला रात्री ११- २६ वाजता सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज दररोज बदलत आहे कधी पाऊस येईल सांगतात तर कधी मान्सून उत्तरे कडे पडाले व सांगतात त्यामुळे खरे काय ते निसर्ग कोणालाही काही कळू देत नाही म्हणतात ना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना एवढे मात्र खरे.

Leave A Reply

Your email address will not be published.