आज नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण

0

नवी दिल्ली : नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज होणार आहे. या वेळी हे चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 2.45 वाजता विशेष चष्म्याऐवजी उघडया डोळ्यांनीदेखील पाहू शकता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून पाहायला मिळणार आहे. आज रात्री 10.38 वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर, 12.40 वाजता 89 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. या वेळी मध्यरात्री 2.45 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली. यावेळी पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी होणार असल्यामुळे हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येऊ शकेल असेदेखील त्यांनी सांगितले.

या चंद्रग्रहणाला वोल्फ मून एकल्प्सि असे म्हणतात. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथेही दिसेल. यावर्षीचे हे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण असून यावर्षीचे चारही चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असतील.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.