आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना मिळणार बूस्टर डोस; लगेच करा नोंदणी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले असतांना या विषाणूवर मात करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस घेणे. या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आता बूस्टर डोस देखील घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून हा बूस्टर डोस मिळणार आहे.

सर्व आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन अॅपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी ‘नागरिक’ अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय व पालिका लसीकरण केंद्रात थेट येऊन (ऑनसाइट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र/ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरात आजपासून (दिनांक १० जानेवारी) हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स आणि ६० वर्षे वयावरील सह व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी वर्धक मात्रा (booster dose) देण्यात येणार आहे.

या सर्व लोकांसाठी कोरोनाच्या प्रिकॉशन डोससाठीचं रजिस्ट्रेशन शनिवारी (८ जानेवारी) संध्याकाळपासून सुरू झालं आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन कर्मचारी मानलं जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट केलं की एक कोटीहून अधिक फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोससाठी एसएमएस पाठवून आठवण करून दिली गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलेल्या अंदाजानुसार १.५ कोटी आरोग्य कर्मचारी, १.९ कोटी फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २.७५ कोटी लोकांना या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक डोस दिले जातील. प्रिकॉशन डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं होतं की यासाठी नवीन नोंदणीची गरज नाही. यासाठी थेट अपॉइंटमेंट घेता येईल. एवढंच नाही तर थेट लसीकरण केंद्रात जाऊनही लस घेता येऊ शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.