आंबे वडगाव-मालखेडा दरम्यान ट्रॅक्टरची मोटरसायकलला धडक

0

अपघातात मोटारसायकल स्वार २ युवक जखमी

पाचोरा :- आंबे वडगाव-मालखेडा ता.जामनेर दरम्यान मोटारसायकलला ट्रॅक्टर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील २ युवक जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दोघ जखमींवर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून शेंदूर्णी दुरक्षेत्रात उशिरा पर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.

शेंदूर्णी ता. जामनेर येथील मुलाचा विवाह बाहेरपूरा पाचोरा येथे असल्याने त्या विवाहास शब्बीर शेख युनूस (वय ३५) रा.छोटा मोहल्ला पहुर व एजाज शेख मतीन (वय ३६) रा. रज्जाकनगर पहुर हे दोघे हिरो होंडा मोटारसायकल एम.एच.१९.९६०६ वर पाचोरा येथे येत असताना सकाळी १०:४५ वाजेच्या दरम्यान वरखेडी कडून शेंदूर्णी कडे भरधाव वेगाने ट्रॅक्टर जात होते. आंबे वडगाव-मालखेडा दरम्यान ट्रॅक्टर ने मोटारसायकल ला जोरदार धडक दिली. यात शब्बीर शेख व एजाज शेख खाली पडून गंभीर जखमी झाले. रोडवर येजा करणाऱ्या बघ्यांनी सांगितले की ट्रॅक्टर इतक्या भरधाव वेगात होते की ट्रक्टर ची ट्रॉलीही पलटी झाली. ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याचे कळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.