‘मिशन शक्ती’ ऑपरेशन : पंतप्रधान मोदींनी भाषणात मांडलेले १२ मुद्दे

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याची घोषणा केली. भारताने मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. काही वेळापूर्वीच आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडले आहे. ‘मिशन शक्ती’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय बनावटीचे आहे.

– पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे…

  • भारताने जमिनीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असणारा उपग्रह यशस्वीरित्या पाडला.
  • अशापद्धतीने लाईव्ह उपग्रह पाडण्याची भारताची पहिलीच वेळ आहे.
  • डीआरडीओच्या शास्ज्ञज्ञांनी या मोहीमेत महत्त्वाची भूमिका निभावली.
  • तीन मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले. लो अर्थ ऑर्बिटमध्ये ३०० किलोमीटर अंतरावरुन अचूक लक्ष्यभेद करण्यात यश.
  • लो अर्थ ऑर्बीट म्हणजे एलईओ प्रकराचे हे उपग्रह हेरगिरीसाठी वापरले जातात.
  • ‘मिशन शक्ती’ नावाने राबवण्यात आलेली ही मोहीम भारतीय वैज्ञानिकांचे मोठं यश आहे.
  • या माध्यमातून भारताच्या ए सॅट क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले.
  • जमिनीवरून क्षेपणास्त्रांच्या मदतीने अंतराळातील घातक उपग्रहांवर हल्ला करणारा चौथा देश ठरला आहे.
  • अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे तंत्रज्ञान वापरणार भारत हा जगातील चौथा देश ठरला.
  • आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही.
  • आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली.
  • आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.