अशोक चव्हाण रुग्णालयात दाखल

0

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रविवारी नांदेडमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

मुंबईतील त्यांच्या कार्यालयाने त्याला दुजोरा दिला. चव्हाण हे गेल्याच आठवडय़ात मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली असता अहवालात संसर्ग झाल्याचे निषन्न झाले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.