चिंताजनक ! जळका भडंगचे एकाच वेळी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

खामगाव : तालुक्यातील जळका भडंग याठिकाणी एक सोबत 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे..पुण्याहून आलेला 25 वर्षीय तरुण गावातील पहिला कोरोना बाधित आढळला होता. त्याच्या कुटुंबाचे आणि संपर्कातील इतरांचे स्वाब तपासणीसाठी पाठविल्यानंतर आज सकाळी माहिती मिळाली की, 6 रिपोर्ट निगेटिव्ह आलेत पण पॉझिटिव्ह रिपोर्टच्या संख्येने प्रशासनाला हादरा दिला. संबधीत तरुणाच्या कुटुंबातील 7 जण कोरोना बाधित आहेत.

आई-वडील, दोन लहान मुली, पुतण्या तसेच इतर मिळून एकूण 7 जण पॉझिटिव्ह मिळून आल्याने खामगाव सह जिल्ह्याची चिंता वाढली आहे. रिपोर्ट रात्री उशिरा 1:30 वाजता प्राप्त झालेत. बुलडाणा जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे, जिथे एक सोबत 7 जण कोरोना बाधित आढळलेत. तरुण आणि कुटुंब मिळून आता जळका भडंग मध्ये 8 जण कोरोना बाधित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.