अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर सह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

अमळनेर,  प्रतिनिधी

हिंगोणे गावाजवळील   बोरी पात्रातून गौण खनिजाची चोरी करुन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहतूक करत असताना दोन ट्रॅक्टर सहित ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीनुसार हिंगोणे गावाच्या जवळील  बोरी पात्रातून गौण खनिजाची चोरी करुन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरुन वाहतुक करीत असल्याची खबर मिळाली. त्यांच्या पथकातील पोहेकॉ. अरुण बागुल, पोकॉ. आशिष गायकवाड, राहुल पाटील, अमोल पाटील हे  सदर भागात जात असताना  शहरातील पैलाड भागात बोरी नदीच्या पुलाजवळ रोडवर एक स्वराज कंपनीचे  निळ्या रंगाचे ट्रक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे एक ब्रास वाळु भरुन चालकनामे प्रकाश भिवा हातगंडे (वय २७ रा. ताडेपुरा मंगल नगर अमळनेर) हा त्याचे मालक किरण रंगराव पाटील रा.पैलाड अमळनेर याचे सांगण्यावरून  वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना मिळुन आला आहे.

तसेच दुसऱ्या घटनेत हिंगोणा गावाजवळ बोरी नदीच्या  पात्रात एक स्वराज कंपनीचे  वाळू भरलेल्या  ट्रॅक्टर चालकाने   पोलिसांना पाहुन जागीच उपसुन ट्रॅक्टर नदितच सोडुन पळुन गेला,  असुन नमुद दोन्ही ट्रॅक्टर वरील चालक व मालक यांच्या  विरुध्दध पोकॉ. राहुल पाटील यांच्या फिर्याद वरुन भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयात दोन्ही ट्रॅक्टर व एक  ब्रास वाळु सह  सात लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन चालक प्रकाश भिवा हातगंडे यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर  गुन्हयाचा तपास कैलास शिंदे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.