अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या २ दुकानांवर छापा; मुद्देमाल जप्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीमधील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली येथे अवैधरित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी मंगळवारी रात्री ११ वाजता छापा टाकला. या कारवाईत सुमारे ९१ हजार ४९३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांना ताब्यात घेतले असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सिंधी कॉलनी भागातील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली भागात अवैधरित्या आणि विना परवाना गुटखा आणि पानमसालाची साठवणूक होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली. या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने मंगळी ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एकाचवेळी राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली येथे छापा टाकला.

या कारवाईत राजाराम नगरातील संतोष हुकमतमल राजपाल यांच्या घरात ६७ हजार ५९५ रूपये किंमतीचा गुटखा आणि पानमसालाचा साठा आढळून आला. संतोष राजपाल याच्या मालकीचे तिजोरी गल्लीतील मिरा ट्रेडर्स नावाच्या दुकानातून २३ हजार ८९८ रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकुण ९१ हजार ४९३ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पो.कॉ. तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात तर पोलीस नाईक दिपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी संतोष हुकमतमल राजपाल आणि एका १७ वर्षीय मुलावर अशा दोघांवर वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरासे आणि पो.कॉ. विजय निकुंभ करात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.