जळगाव (प्रतिनिधी) | बोदवड तालुक्यातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. या तरुणाने ९ जुलै रोजी मुलीस पळवून नेले होते.
राहुल जानकीराम घुलकर (वय १८, रा. साळशिंगी, ता. बोदवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ९ जुलै रोजी बोदवड तालुक्यातील पाचदेवळी शिवारात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. मुलीच्या वडिलांनी वरणगाव पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक व संदीपकुमार बोरसे यांची तीन स्वतंत्र पथक तयार करून मुलीचा शोध सुरू केला होता. अखेर ही मुलगी राहुल घुलकर याच्या ताब्यात मिळून आली.