अर्णबच्या अटकेचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही

0

रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या अटकेनंतर विरोधकांकडून ठाकरे सरकारवर आरोप प्रत्यारोपण केले जात आहे. दरम्यान, यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. इथं सर्वकाही कायद्यानुसार चालतं. अर्णव गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही’, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूड उगवत नाहीत, अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.