अरूणाचल प्रदेश : आमदार तिरोगं अबो यांच्यासह 11 जणांची हत्या

0

ईटानगर – अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासहीत घरातील 11 जणांची हत्या करण्यात आली आहे. माध्यमांच्या माहितीप्रमाणे संशयीत नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नगालंड(एनएससीएन) च्या दहशदवाद्यांनी मंगळवारी सकाळी 11:30 वाजता त्यांच्या घरावर हल्ला केला. ही घटना अरूणाचल प्रदेशातील तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत म्हटले आहे की, आमदार अबो व त्यांच्या कुटूंबीयांच्या मृत्यूच्या बातमीने एनपीपी स्तब्ध आणि अतिशय दुखी आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. तसेच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे दोषींविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी करत आहोत.

अबोह 2014 मध्ये पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या तिकीटावर खोंसा पश्चिम विधानसभेतून आमदार म्हणून निवडणून आले होते. यावेळेस ते एनपीपीच्या तिकीटावर परत एकदा निवडणूक लढवत होते. अरुणाचलमध्ये 2 लोकसभेच्या जागांसहितच 60 विधानसभेच्या जागांसाठीही मतदान झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.