अमोल शिंदे यांचे विरोधात पिंपळगाव पोलिसात तक्रारी अर्ज

0
– कुऱ्हाड येथील तानाजी पाटील यांनी केला तक्रारी अर्ज दाखल
पाचोरा  प्रतिनिधी
सोशल मीडिया वरुन केलेल्या पोस्टचा राग आल्याने अमोल शिंदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे कुऱ्हाड येथील तानाजी पाटील यांना खडसावले असुन याची गंभीर दखल घेत तानाजी पाटील यांनी पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशन गाठुन सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल यांना अमोल शिंदे यांचे विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
*तक्रारी अर्ज याप्रमाणे आहे*
मी तानाजी युवराज पाटील (वय – ३६) रा. कुऱ्हाड खु” ता. पाचोरा, जि. जळगाव, धंदा –  शेती पत्नी व मुलांसह वरील पत्त्यावर राहतो व शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असतो मी शिवसेना या पक्षाचा प्रमुख म्हणून पक्षातील पदाधिकारी आहे. नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली असून शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात निवडणुकीत अमोल पंडित शिंदे रा. विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा जि. जळगाव हे  प्रतिस्पर्धी  म्हणून उभे होते. सदरच्या निवडणुकीत अमोल शिंदे कमी मतांनी पराभूत झालेले असल्याने त्यांना त्यांच्या या पराभवाचा प्रचंड राग आणि संताप दिसून आला आहे. त्यांच्यावर यापूर्वी पाचोरा पोलिस स्टेशनला शासकीय कामात कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदरच्या गुन्ह्या संदर्भात न्यायालयाने सदरचा दावा १०/२०१८ या क्रमांकाने दाव्याचे चार्जशीट दाखल केले असून सदर खटला पाचोरा न्यायालयात खटल्यातील कलम २५३ च्या सुधारित तरतुदीनुसार न्यायालयात वर्ग केला आहे. व तो जिल्हा न्यायालयात चौकशीसाठी प्रलंबित आहे. असे असतांना दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजुन ४५ मिनिटांनी मला माझ्या ८६००२२५९३९ या माझ्या मोबाईल क्रमांकावर अमोल शिंदे यांच्या ९८६०८९९६३५ या क्रमांकावरून फोन आला. सदर चा नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव्ह करण्यात आला असल्यामुळे मी तो उचलला माझ्या मालकीचा मोबाईल हा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड प्रकारचा आहे. यामध्ये कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. सदरच्या फोन वरून अमोल शिंदे यांनी मला तानाजी कधी चालतोय माझ्याबरोबर पर्यटनाला तुमच्या फॅमिलीला घेऊन मला तुमच्या फॅमिलीसोबत पर्यटनाला जायचे आहे तू टाकलेले पोस्ट मी बघितली तुला हवे तर माझा फोन रेकॉर्ड करून ठेव. तुझ्या पूर्ण फॅमिलीला पर्यटन करून टाकीन. जिथे कुठे तू सापडेल तिथे तुला शिक्षा मिळणार. तू मला माफी म्हणून काही म्हणून मी ती मिळणार नाही दयामाया राहणार नाही. त्याबाबत मी त्यांना विचारले की, मी पोस्ट काय टाकलेली आहे त्या वेळेला माझे ऐकून न घेता ते बोलत राहिले की ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुझी पोस्ट आलीच नाही पाहिजे त्यावर मी त्यांना विचारले भाऊ तुम्ही मला धमकी देतात का तुला जे समजायचे ते समज असे ते म्हणाले त्यावर मी त्यांना विचारले की, तुम्ही माझ्या कुटुंबावर का जात आहात त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की, मी तुला धमकी दिली आहे असे समज माझ्याकडून द्यावयाची अपेक्षा ठेवू नकोस जिथे कुठे तू मार्गात आला तिथे तुला संपवाल ही माझी धमकी आहे मी तुझ्या फॅमिलीला पर्यटन ला घेऊन चाललो आहे हे मी म्हटले आहे यात मी वाईट काहीच म्हटलेले नाही तुझ्या फॅमिलीला मी पर्यटन ला घेऊन जातो तू जिथे भेटशील तिथे तुला बघतो अशाप्रकारे अमोल शिंदे यांनी माझ्याशी त्याच्यावरील क्रमांकावरून फोन करून मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे माझ्या पत्नीबद्दल तिला पर्यटन ला घेऊन जातो अशा आशयाचे वक्तव्य करून माझ्या पत्नीचा विनयभंग केला आहे मी गरीब कुटुंबातील असून माझी मुलगी व पत्नी व आई-वडील शांततेच आयुष्य जगात आहे मात्र अमोल पंडित शिंदे यांनी मला माझ्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने माझी काही चूक नसताना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून माझ्या पत्नीला पर्याय देण्याचे वक्तव्य करून तिचे एक प्रकारे अपहरण करण्याचे व तिचे जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला आहे अमोल शिंदे यांची प्रचंड भीती मुळे मी रात्री तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनात येऊ शकलो नाही सदरच्या फोन नंतर रात्रभर मी व माझे कुटुंब झोपू शकले नाही तसेच आमच्या घरात कोणी जेवले सुद्धा नाही माझे वृद्ध आई – वडील यांनीदेखील या फोन बाबत मी माहिती दिल्याबद्दल त्यांना देखील मोठा मानसिक धक्का बसला असून ते सुद्धा त्यांच्या दहशतीखाली आहे. अमोल शिंदे यांनी कोणत्याही कारण घडलेल्या नसताना माझ्या पोस्ट चुकीचा अर्थ लावून याबाबत शहानिशा न करता मला माझा मोबाईल क्रमांक ८६००२२५९३९ व्या क्रमांकावर त्यांच्या ९८६०८९९६३६ मोबाइल क्रमांकावरून फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व माझ्या पत्नीच्या मानभंग होईल असे बोलल्याने विनयभंग होत आहे याची जाणीव असून तसेच बोलून तिचा विनयभंग करून एक प्रकारे तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करायला अशा प्रकारचा अपशब्द असणारी धमकी दिली म्हणून माझी शिंदे यांच्या विरोधात लेखी आहे मी माझी सदरची फिर्याद नोंदवून अमोल शिंदे यांच्या कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती मी सदर संभाषणात उल्लेख केलेले माझ्या सदर पोस्ट संदर्भातील मी घेतलेले स्क्रिनशॉट्स चे प्रिंटाऊट या फिर्यादी सोबत जोडलेल्या आहेत तसेच अमोल पंडित शिंदे यांनी मला केलेल्या फोनचे संभाषण माझ्या फोन मधील मेमरी कार्ड मध्ये रेकॉर्ड झालेले आहे ते मी मेमरी कार्ड या सोबत जोडलेले आहे या फिर्यादी अर्जासोबत पुरावा म्हणून दाखल करीत आहोत कृपया माझ्या करायची कंबर नोंद घेऊन अमोल पंडित शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच अमोल शिंदे व त्यांच्या आकार कडून मला व माझ्या कुटुंबीयांना जीवास असलेला धोक्याची नोंदीवर माझे माझ्या कुटुंबाचे संरक्षण याबाबत योग्य ती तजवीज करावी ही विनंती. अशा आषयाचा तक्रारी अर्ज अमोल शिंदे यांचे विरोधात पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल यांना देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.