अमेरिकेत अज्ञाताच्या अंदाधुंद गोळीबारात 11 ठार

0

अमेरिका :- अमेरिकेतील वर्जिनिया येथे अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर आत्तापर्यंत 6 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. ही भयानक घटना शहराच्या मध्यभागी शुक्रवारी रात्री घडली आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, वर्जिनिया येथील सरकारी इमारतीत हा गोळीबार झालेला आहे. गोळीबार करणारा माथेफिरू वर्जिनिया येथील म्युनिसिपल सेंटरचा कर्मचारी आहे. त्याने केलेल्या गोळीबारात एक पोलीसदेखील जखमी झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.