अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.. (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने हे गाणं लाँच करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ही घोषणा केली होती.

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेश वंदनेचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, तसा तुम्हालाही होईल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. आता अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही हीट ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं होतं. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. त्यानंतर अमृता यांची ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.’, ‘ये नयन डरे डरे’ ही गाणीही चांगलीच गाजली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.