अमळनेर तालुक्यात लोटाबहाद्दरांवर गुन्हे दाखल

0

अमळनेर : तालुक्यात हागणदारी मुक्त करण्यासाठी आजपर्यंत 66 लोटाबहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उघड्यावर शौचाला जाणा-यांवर आजपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 115व 117अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, पण उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तरी ज्या कुटुंबांकडे अजूनही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही त्यांनी आपले आधार कार्ड ग्रामसेवकाकडे जमा करावे.

संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी तात्काळ गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून ग्रामसभेच्या ठरावासह संबंधित लाभार्थ्यांची नावे पंचायत समिती मधील स्वच्छ भारत कक्षात जमा करावीत जेणेकरुन तालुक्यातील एकही कुटुंब शौचालयापासून वंचित राहणार नाही. वेबसाईट कधीही बंद होऊ शकते त्यामुळे ही कार्यवाही उद्यापर्यंत होणं अपेक्षित आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय देऊ पण उघड्यावर शौचाला जाणा-यांवर वरील नमूद कायद्याच्या सोबतच भारतीय दंड संहिता कलम 269अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. यामध्ये 1200रूदंडात्मक रक्कम आणि  सहा महिने तुरुंगवासही होऊ शकतो याची गांभीर्याने नोंद घ्यावी व  उद्यापासून महिलांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील व उघड्यावर शौचाला जाणा-या कुणाचीही गय केली जाणार नाही.असे गटविकास अधिकारी पंचायत समिती अंमळनेर यांनी कळविले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.