कुरीयर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने केला 7 लाखाचा अपहार

0

परस्पर मालाची लावली विल्हेवाट

भुसावळ (प्रतिनिधी)-  इलास्टीक रन कुरीयर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने ग्राहकांचे पार्सल त्यांच्या पत्त्यावर न पोहोचवता परस्पर त्याची विल्हेवाट लावत तब्बल 7 लाख 30 हजारांचा अपहार केल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

निलेश राजेंद्र भावसार (रा.प्रल्हाद नगर, भुसावळ)  हा डिलिव्हरी बॉय इलास्टीक रन कंपनीतर्फे भुसावळात  ऑनलाइन ऑर्डर नोंदवून ग्राहकांचे पार्सल त्यांच्या पत्त्यावर पोहोचवण्याचे काम  करत होता मात्र त्याने 12 मोबाईल, एक टीव्ही, कॅमेरा आणि म्युझिक सिस्टम असा मुद्देमाल संबंधीत ग्राहकांना न देता परस्पर मालाची विल्हेवाट लावली. संशयिता ने एकूण सात लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा कंपनीचे श्रीकृष्ण संजय साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी तपास करत आहेत.

आरोपी निलेशच्या अटकेनंतर मुद्देमाल कुठे ठेवला वा कुणाला विकला याचा उलगडा होणार आहे. संबंधितांकडून मोबाईल, टीव्ही, कॅमेरा विकला असेल तर त्यांच्याकडून तो जप्त केला जाणार आहे व न दिल्यास माल विकत घेणाऱ्यांही या गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याचे पोलिस सुत्रानीं सांगितले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.