तहसीलदारांच्या वाहनांवर वाळूचे ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

0

अमळनेर :- अवैध गौण खनिज वाहतूकदारांचा  तहसीलदारांचे शासकीय वाहनांवर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, दि.८ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास खर्दे- वासरे रस्त्यावर तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  सदर महसुल पथकात मंडळ अधिकारी भानुदास शिंदे, तलाठी स्वप्निल कुलकर्णी, तलाठी गौरव शिरसाठ, तलाठी केशव चौधरी, शासकीय वाहनचालक बाळकृष्ण जाधव हे होते. याप्रकरणी ट्रॅक्टर (एमएच 19 – 807) वरील चालक भिमराव कैलास वानखेडे (रा. चौबारी, ता. अमळनेर) यावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूने भरलेले वाहन मारवड पोलिसांच्या ताब्यात आहे.प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तापी, बोरी व पांझरा काठावरील वाळूच्या ठिकाणांवर जमाव बंदीचे आदेश देऊन अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावला आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांनीही विविध भागात पथकाची नेमणूक करून कडक गस्त ठेवली आहे. पोलीस सुध्दा गस्ती दरम्यान चोरट्यांवर लक्ष ठेवुन सापडताच गुन्हे दाखल करत आहेत. मात्र, छुप्या पद्धतीने अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.

अवैध गौण खनिज वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द मारवड पो स्टे ला भादंवि क.३५३,३७९,२७९,१८८ ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन तपास सपोनि राहुल फुला पो हवालदार,किशोर पाटील पोना , सुनिल अगोणे व चापोना दिनेश कुलकर्णी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.