अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी दोन विवाहित महिलांची आत्महत्या

0

अमळनेर : तालुक्यात दोन विवाहित तरुण महिनांनी एकाच दिवशी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

अमळनेर शहरातील आर.के.नगरमधील भावना दीपक पाटील (वय ३२) या महिलेने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या घेतली. याबाबत जितेंद्र पवार यांच्या खबरीवरून अमळनेर पोलीस स्टेशनाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपो उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहे.

तर दुसरी घटना ही तालुक्यातील मांडल मधील सोनाली राजू कांबळे (वय २०) या महिलने दुपारी २ वाजता छताच्या काडीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. सोनाली हिचा दिड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. पोलीस पाटील भास्कर पाटील यांच्या खबरीवरून मारवाड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेकॉ प्रकाश चव्हाण करीत आहे. मात्र दोघांचे आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.