अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

उत्तर मुंबईमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता

मुंबई : रंगिला गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.  उर्मिलाला काँग्रेसकडून आज दिल्लीत बोलवण्यात आले होते.  यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते मिलिंद देवरा, काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला, काँग्रेस नेते संजय निरुपम देखील उपस्थित होते

गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिलाच्या काँग्रेस प्रवेशाची मोठी चर्चा होती. आज अखेर उर्मिला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानते. माझ्यासाठी हा दिवस खूप मोठा दिवस आहे. माझ्या कुटुंबाची वाटचाल ही गांधीजी आणि नेहरूजींच्या विचारांवर राहिली आहे. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले. संविधान दिले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. मात्र आज अशी परिस्थिती आली आहे की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी मी सक्रीय राजकारणात उतरली आहे, असे उर्मिला यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी उत्तर मुंबईतून मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही उमेदवारी मागितली होती. परंतु उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून उर्मिलाचे नावाची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत पक्षश्रेष्ठींकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.