यावल येथे टायगर ग्रुप कडून पाणपोईची सेवा

0

यावल :- उन्हाळ्यात वाढत्या तापमानात सर्वांना वारंवार तहान लागते मात्र अनेक वेळा पिण्याचे पाणी जागोजागी उपलब्ध नसल्याने प्रवासी वाहन चालकांचे व इतर स्त्री-पुरुषांचे हाल होतात. ही समस्या लक्षात घेऊन शहरातील टायगर ग्रुप ने यावल फैजपुर रस्त्यावर कला वाणिज्य महाविद्यालया समोर एक पाणपोई सुरु केली. पाणपोईची सेवा उपलब्ध झाल्याने सर्व स्तरतुन टायगर ग्रुप ने सुरु केलेल्या या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येऊन समाधान व्यक्त करण्यात आहे.

महाविद्यालयात येणारे जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शेतात जाणारे मजूर वर्ग आणि वाहनचालकांना ह्या पाणपोईचा सर्वात जास्त लाभ होणार आहे. अशा शुद्ध उद्देशाने आई हॉस्पिटल च्या सौजन्याने डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मदतीतून ही पाणपोई सुरू करण्यात आली त्यासोबत टायगर ग्रुपचे रितेश बारी, उज्वल कानड़े, निर्मल चोपडे, अमोल पाटील, सागर इंगळे, हर्षल कुळकर्णी, जयेश करांडे, मनोज बारी, भोजराज ढाके इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.