भारत विकास परिषद पाचोरा शाखेची बैठक संपन्न

0

पाचोरा :- भारत विकास परिषद पाचोरा शाखेची सभा नुकतीच पाचोरा येथे अध्यक्ष डॉ. अतुल महाजन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तुषार तोतला, जनकल्याण समितीचे अध्यक्ष मनिष काबरा, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष डॉ. अनिल देशमुख हजर होते.
मार्गदर्शनपर भाषणात तुषार तोतला यांनी इतर क्षेत्रातील व्यक्तींचा व महिलाचा समावेश करावा, शाळेत स्पर्धा आयोजित करून विकास परिषदे पंचसूत्री बदल सूतोवातच केले.

तर डॉ. अनिल देशमुख यांनी आरोग्य हेच मुळात विकासाचे साधन असून ते चांगले असेल तरच सर्वांगीण विकास शक्य आहे. असे प्रतिपादन करून सर्वच डॉक्टरांचे स्वागत केले व संस्था वाढीसाठी कसे काम करता येईल यावर अनेक प्रकल्पावर सभासदांशी संवाद साधला. रवींद्र पाटील यांनी सर्व सामान्यांशी संपर्क करून डॉ. अपर्णा देशमुख यांचे आभाळमया वृद्धाश्रम, डॉ. हेगडेवार हॉस्पिटल, सविता कुलकर्णी यांनी औरंगाबाद येथे अतुलनीय कार्य प्रकल्पास भेट देऊन प्रेरणादायी कार्य म्हणून मार्गसर्शक ठरेल असे आवर्जून त्यांचे कार्याचा गौरव केला. डॉ.अतुल महाजन यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर केला त्यात प्रामुख्याने किशोरवयीन विद्यार्थिंनी साठी कॉलेज व माध्यमिक विद्यालय मधून केलेले कार्य, तसेच प्लास्टिक विरोधी अभियान, कापडी पिशव्या वाटप, व दर शनिवारी पाणपोई बाजार दिवस म्हणून चालू करणेबाबत विचार मांडले त्यावर सांगोपांग चर्चा झाली व लवकरात लवकर हे प्रकल्प अमलात आणण्याचे ठरले. डॉ. पंकज हरणे संघटक यांनी सूत्र संचलन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.