अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 20 सैनिक ठार

0

काबुल – अफगाणिस्तानमधील फराह प्रांतात तालिबानींनी एका चेकपॉईंटवर केलेल्या हल्ल्यामध्ये 20 सैनिक ठार झाले आहेत. गुलिस्तान जिल्ह्यात रात्री झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी दोन सैनिकांना पकडले असून अपहरण झालेल्या या सैनिकांबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही, असे प्रांतिय परिषदेचे अध्यक्ष ददौल्ला कनेह यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानचा प्रवक्‍ता कारी युसुफ अहमदीने स्वीकारली आहे.

रविवारी तालिबान्यांनी स्फोटकांनी भरलेली कार उत्तर बगलान प्रांतातील पोलिस मुख्यालयामध्ये घुसवून कारचा स्फोट घडवून आणला होता. त्यावेळी झालेली चकमक तब्बल 6 तास सुरू होती. या हिंसाचारात सर्व हल्लेखोर मारले गेले. पण एकूण 55 जण या चकमकीत मारले गेले. त्यात 13 पोलिस कर्मचारी आणि 20 नागरिकही ठार झाले होते, असे गृह मंत्रालयने सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.