अपंगबांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा

0

भुसावळ गोसेवक परिवारातर्फे निवेदन
भुसावळ | प्रतिनिधी
शासकीय योजनांपासून वंचित अपंगांना न्याय मिळावा तसेच शैक्षणीक मुलभुत सुविधा व योजने पासुन जे वंचित आहे त्या गोरगरीबांना न्याय द्यावा अशी मागणी येथील गोसेवक परिवारातर्फे करण्यात आली असून दिनांक १७ मार्च रोजी अपंग दिना निमित्त प्रांताधिकारी कार्यालय व तहसीलदार भुसावळ यांना निवेदन देण्यात आले.
अमोल जाधव , शुभम गोकुळ ठाकुर , चंद्रभान नितीन पवार , ललीता हरी बोदडे , या अपंग बांधवाना आज पावेतो कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही . यामधील ललिता बोदडे ही ६ वर्षीय बालिका मूक बधिर आहे यामुळे यांना शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे तरी महोदयांनी यांना त्वरित शासकीय योजना व सोइ सुविधा मिळवून न्याय द्यावा अशी मागणी गोसेवक रोहित महाले यांनी व समस्त बाधवांनी केली . या अपंग गोरगरीब बांधवाना न्याय न मिळाल्यास न्याय देण्यासाठी तटस्त भुमिका घेऊन प्रसंगी लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला . यावेळी गोसेवक परिवाराचे रोहित महाले , साहिल मेढे , कुंदन पठाडे ,हरीश पवार आदी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.