… अन् तीन महिला संस्थांची झाली निवड! भाग ३

0

थातुरमातूर कारण देवून केली निविदा रद्द : गोडबंगालाची भरली शाळा

जळगाव, दि. 10 –
केंद्र व राज्य सरकारच्या घरपोहच आहार योजनेसाठी (टी.एच.आर) शासनाकडून रितसर निविदा मागविण्यात आल्यानंतर काही लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी वेगळीच शाळा भरवित मनमानी पद्धतीने मर्जीतल्या महिला संस्थांच्या निविदा मंजूर करुन त्यांना हा मक्ता दिल्याने त्याची गुणवत्ता पार रसातळाला गेली आहे. 80 पैकी केवळ तीनच संस्थांची परस्पर निवड करण्यात झाल्याने या प्रकरणात सुरुवातीपासून गोडबंगाल असल्याची शंका निर्माण झाली आहे.

महिलांचे कार्य पुरुषांचा सहभाग
महिला बचत गटांकडेच हा ठेका देणे, त्यात एकही पुरुष नसणे अशा स्वरुपाच्या महत्त्वपूर्ण अटी व शर्ती असताना देखील अनेक पुरुष या मक्तेदारीत सहभागी आहेत. महिलांच्या नावे असलेले बचत गट पुढे करुन पुरुष हा सारा भार वाहत असल्याचे धुळे येथील पदाधिकार्‍याच्या सहभाने स्पष्ट झाले आहे. शासनाच्या मुळ हेतूला हरताळ फासण्याचा प्रकार घडत असताना देखील अधिकारी मात्र अळी मिळी गुप चिळी अशीच भूमिका घेताना दिसून येत आहेत. एकंदरीत महिलांचे कार्य अन् पुरुषांचा सहभाग असाच हा प्रकार आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शेवयांचा पुरवठा बुरशीयुक्त होत असल्याचे प्रकार समोर आल्याने या गोडबंगालाची चर्चा होवू लागली. जिल्हा परिषदेमधील
सत्ताधारी असलेल्या भाजपाने धुळ्यातील भाजपा पदाधिकार्‍याच्या संस्थेला हा मक्ता देवून या गोडबंगाल कारभाराला खतपाणी घालण्याचे काम सुरु केले. शासनाने निविदा मागविल्यानंतर 80 संस्था व बचत गटांनी त्यासाठी नामांकन दिले. मात्र शासनस्तरावरुन आलेल्या समितीने अत्याधुनिक मशनरी उपलब्ध नसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करुन अनेकांची दांडी उडविली. त्यानंतर 80 पैकी 62 जणांच्या निविदा नामंजूर करण्यात आल्या; उर्वरित 18 पैकी केवळ तीन संस्थांना हा मक्ता देवून वेळ मारुन नेली. शासनाने हा ठेका घेणार्‍या संस्था व बचत गटांना विविध अटी व
शर्तींचे वलय घातले मात्र वरिष्ठांनी ठराविक संस्था व बचत गटांना मक्ता देवून आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे.
हा ठेका देताना केंद्र व राज्य सरकारमधील काही नामांकीत तज्ज्ञ प्रत्यक्ष कामावर जावून माहिती घेत असतात. तेथील सोयी-सुविधा, शासनाने घातलेल्या अटी व शर्तींबाबत पडताळणी करण्याचे काम करते. हे काम करी असताना रद्द केलेल्या संस्था व बचत गटांना केवळ अत्याधुनिक साहित्य नसल्याचे कारण पुढे करुन नामंजूर करण्यात आल्याने शंकांचे माहोळ उठले आहे. हे मक्ते देताना सुरुवातीपासूनच गोडबंगालाची शाळा भरल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.