अनुभूती इंटरनॅशनल स्कुलमध्ये ‘सायन्स एक्झीबिशन’चे आयोजन

0

जळगाव :– अनुभूती इंटरनॅशनल स्कुलमध्ये ‘सायन्स एक्झीबिशन’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा विज्ञानविषयक दृष्टिकोन वाढीस लागावा, त्यांच्याकडुन विज्ञानात नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी यावर्षीही त्याचे आयोजन केले असून, उद्या (दि. २६) या प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे. दि. २६ ते २८ फेब्रुवारी असे तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात अनुभूती इंटरनॅशनल स्कूलबरोबर जळगाव शहरातील आठ व भुसावळ येथील दोन शाळांतील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेणार आहे.

नोबेल पारितोषिक मिळवणारे भारताचे पहिले शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांचा २८ फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे. यानिमित्त अनुभूती इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणाऱ्या ‘सायन्स एक्झीबिशन’मध्ये नऊ शाळांचे विद्यार्थी विज्ञानविषयक इनोव्हेटिव्ह मॉडेल्सचे दोन दिवस सादरीकरण करतील. या ‘सायन्स एक्झीबिशन’चा समारोप गुरुवारी (दि. २८) होणार आहे. विद्यार्थ्यांनी सायन्स एक्झीबिशन पाहण्यासाठी गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत अनुभूती स्कूलमध्ये उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

समारोपाच्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. डॉ. होमी भाभा यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या नॅशनल ॲवॉर्डने सन्मानित झालेला बालसंशोधक प्रणव सोनारदेखील या वेळी उपस्थित राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.