अजित पवारांवर विश्वास का ठेवला? राज्यातील घडामोडींवर अमित शहांनी सोडलं मौन

0

 नवी दिल्ली : – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रंगलेल्या राजकीय नाट्याचा अखेर काल शेवट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचा डाव उलटून लावला आहे.  दरम्यान, या सर्व घडामोडींवर भारतीय जनता पक्षाचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या मौन सोडलं आहे.  ‘अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असं शहा यांनी सांगितलं.

भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे.दरम्यान, अमित शहा म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी आमदारांच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडलेले होते. त्यांना सरकार बनविण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते. राज्यपालांनीही सरकार बनविण्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने पहिल्यांदा सरकार बनविण्यास असमर्थता दाखविली त्या पत्रावरही अजित पवारांची स्वाक्षरी होती. आमच्याकडे पाठिंब्याचे जे पत्र आले त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. या दरम्यान अजित पवारांवरील कोणतेही प्रकरणं मागे घेण्यात आली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.